शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय महाडिक यांच्या पुतळ्याचे मुरगूडात दहन- मंडलिक यांच्या टीकेला प्रत्युउत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 20:26 IST

खासदार धनंजय महाडिक यांनी प्रा.संजय मंडलिक यांच्यावर खालच्या पातळीवर येवून जी टीका केली त्याचे आज मुरगूड शहरासह कागल तालुक्यात तीव्र पडसाद उमटले

मुरगूड : खासदार धनंजय महाडिक यांनी प्रा.संजय मंडलिक यांच्यावर खालच्या पातळीवर येवून जी टीका केली त्याचे आज मुरगूड शहरासह कागल तालुक्यात तीव्र पडसाद उमटले.तुकाराम चौकातून रॅली काढत,निषेधाच्या घोषणा देत मुरगूड येथील एस.टी.स्टॅन्ड परिसरात खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी महाडिकांच्या निषेधाच्या घोषणानी परिसर दणाणून सोडला.यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार निषेध व्यक्त करताना म्हणाले ,घराणेशाहीचे राजकारण करणा?्या महाडिकांनी निष्ठा शिकवू नये पराभव समोर दिसू लागल्याने ते खालच्या पातळीवर टीका करीत आहेत जिल्ह्यातील जनता थारा देणार नाही . कागल तालुक्याच्या स्वाभिमानाला महाडिकानी डिवचले आहे.जर हा उद्योग महाडिकानी बंद केला नाही तर त्यांना कागल तालुक्यात आपण पाय ठेवू देणार नाही प्रा मंडलिक हे सदाशिवराव मंडलिक यांच्या विचारावर राजकारण करत आहेत ते क्रियाशील आहेत.त्यांनी अनेक पदावर चांगले काम केले आहे हे जनतेला माहित आहे त्यामूळे येत्या निवडणूकीत जनता त्यांनाच स्वीकारणार आहे.

खासदार महाडिक यांच्या पुतळा दहन करताना नगराध्यक्ष राजेखान जमादार, दत्तात्रय मंडलिक,मारूती ओतारी, संजय चौगले, सचिन भारमल, राजू महाजन, विक्रम घाटगे, पीर महंमद जमादार, सम्राट मसवेकर, अमर सणगर, प्रकाश हळदकर, पांडूरंग चौगले, जोतिराम ताटे, महेश ओतारी, अभिजित कांबळे, अरूण ढोले, विनायक मंडलिक, जितेंद्र मिठारी आदि उपस्थित होते.

 

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण